“कृष्णा धावरे कृष्णा धाव रे…. ” असं  म्हणण्या ऐवजी “धाव गं राधिका धाव गं…” हे म्हटलं तर कसं राहील? ‘राव अँडव्हेंचर सोल्युशन्स, पुणे आयोजित वूमेनेथोन मध्ये मला चीफ गेस्ट म्हणून निमंत्रित केलं होतं. म्हटलं आपणही धावून बघावं. म्हणून १० किलोमीटर चा रन पूर्ण केला आणि तोही पहिल्या १० मध्ये संपवून. सगळ्या महिलांनी अगदी उत्साहाने, जल्लोषात, अभिमानाने भाग घेतला. हातात हात धरून बायका धावत होत्या. सगळ्या बायका एकत्रं मिळून धावत आहेत ही गम्मत पाहण्यासारखी होती आणि कौतुकाची बाबही होती. त्याहून कौतुकाची बाब म्हणजे त्यांना सोडायला आणि न्यायला आलेल्या पुरुष मंडळीचे. मला माझा भाऊ सोडायला आला होता आणि नवरा न्यायला, यातच सगळं आलं नाही का.  Thank you for letting me be what I am and for always making me feel special! निमित्त काहीही असो. आम्हा स्त्रियांची समानतेची धडपड सुरूच आहे. तुम्ही आहात त्यामुळे आम्हाला आमचे हक्क, खांद्याला खांदा लावून उभी राहायची जागा आम्हाला मिळेल असा विश्वास वाटतो. तुमच्या सारख्या पुरुष मंडळींना आम्हा बायकांचा सलाम. आणि हो “धाव रे कृष्णा धाव…” असं म्हणण्यातच आम्हाला जास्त आनंद आहे.

                                                                                                                           – रानी देशपांडे
Ranee's Blog

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *