मराठी माणूस, मराठी मन, मराठी जग, मराठी बाणा, मराठी पाऊल, मराठी मुलगी आणि मराठी नाटक. मराठी असण्याचं किती कौतुक असतं नाही आपल्याला… आपण कोण आहोत, कुठे वाढलो, आपले आचार विचार सगळं सगळं आपल्या भाषेने ठरविलंय. आपली भाषा आणि भाष्य करणाऱ्या कविता (मला सापडलेला नवीन छंद), अर्थात मराठीतच. आज मराठी भाषेचा दिवस आपण एव्हड्या उत्साहात आणि कौतुकाने साजरा करतो. मराठी म्हणून सतत बदलत्या जगाला स्विकारत असतो, ते आत्मसात करीत असतो, स्वतःत बदल घडवीत असतो, नवीन विचार जोपासत असतो, बुरसटलेले विचारही टाकून देतो. आपल्यात हवे तसे आचरणात बदल होत जातात. जसे पोशाख आधुनिक होतात तशी भाषाही. आज अनेकदा मराठी भाषेत इंग्रजी भाषेची भेसळ झालीये, लज्जास्पद गोष्ट आहे, लोकांना भीती वाटायला लागली आहे,  की ही भाषाच नष्ट होईल कि काय? पण मला विचाराल तर असं काहीही होण्याची तीळमात्र शक्यता नाही. ज्या माणसाचे मन मराठी त्याला कसली आलीये भीती? त्याला हव्यात कशाला चिंता? सुखाने राहणारे आपण माणसं… आपली माणसं असे कसे होऊ देतील बरे? मुळात जोपर्यंत आपल्याला मराठी असण्याचा स्वाभिमान आहे, जोपर्यंत वीर सावरकर आपल्या मनात आहे, जोपर्यंत शिवाजी आपल्या शरीरात आहे, आणि संत ज्ञानेश्वारांनी मराठीला “अमृताहुनी गोड” असे म्हटले आहे, अशी शिकवणच आपल्या रक्तात आहे, तर कशाची आलीये भीती?
मुळात भाषेवर आणि आपल्या माणसांवर प्रेम हवं. मग तो खानदेशी, कोकणी, मराठवाडी, विदर्भी अगदी कुणीही असो, बोलतो तर आपण मराठीच!! शेवटी आपली मायबोली एकच हे विसरून कसं चालेल. त्यामुळे आजच्या मराठी भाषेचं काय होईल, कुठे जातेय आपली भाषा;  याची चिंता विवेचन करण्यापेक्षा, आपल्याला ही भाषा कुठे न्यायची आहे याचा विचार केला तर ते जास्त सकारात्मक ठरेल.
एक होऊन, इंग्रजी भाषेत का होईना  “Enjoy” करूया पण  “माज” करूया मराठीतच!!!IMG-20160227-WA0001
Ranee's Blog

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *