तुला दुरूनच बघायला आवडतं …
तुझ्यात मिसाळायला आवडत नाही…
तुझ्या अथांग, अविरत स्वभावाचा आदर वाटतो…
पण तुझ्या प्रेमात पडायला आवडत नाही….
तुझ्या हिरव्यागार आणि निळ्याशार असलेल्या रंगाला आलेली पांढरी शुभ्र झालर
मला आवडते….
आवडते झालारीला असलेली दगडांची काठ जी तू कधीच सुकू देत नाहीस…
इतरांना ओलं  करण्याचा तुझा हट्ट मला कळत नाही….
तू येतोस भरधाव वेगानं काठेवर उभी असलेल्या मला भेटायला…
मी भिजणार नाही फक्त तुला दुरून पाहणार असा हट्ट असतो माझाही…
त्याच नकळत क्षणी मला तू शिवतोस आणि पळून जातोस लांब…
असा कसारे वेडा तू ?
अविरत निरंतर सोडतोस लाटा तुझ्या…
वाटतं तू कधी दमत का नाहीस ?
ये काठाशी बस माझ्यासारखा होऊनिया संथ… शांत…
पण तू कुठे आहेस ऐकणारा ?
तू जातोस परत मला ओलं  चिंब करुनी…
मग आठवणींचे  क्षण येता मनी मीही निघते तुला दूर लोटुनी…
वेडी आहे मी पण… परत येईन तुज पाशी आणि म्हणून पाहीन पुन्हा एकदा
“ये बस जरा वेळ मज पाशी, दमला असशील तुही… “
———–रानी IMG-20160320-WA0005
Ranee's Blog

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *