जपून नं जाण्यातच मजा आहे नाही का …. ?!
रंगांचा खेळ उद्या…. नेतो मला माझ्या बालपणी… उद्या रंग लागणार चेहऱ्यावर !?
लहानपणी केव्हडे खेळायचो नाही रंगपंचमीला? भर उन्हात, परीक्षेच्या दिवसांमध्ये रंगांची उधळण. त्या पिचकाऱ्या, त्या गाठी, तो उत्साह, मौज मजा, ती खेचा खेची. हसत खेळत मस्ती करायचो आम्ही.….
आजकाल हे सगळं हातचं राखून करायला लागलो आहोत की काय असं वाटायला लागलंय… रंगांमध्ये भेसळ, पाण्याचा अभाव आणि “Allergic to Masti” असे लोक जास्त सापडतात.?
पूर्वी सांगावं लागायचं “ए आता बस हा…. आता लावू नकोस रंग” ” शी बाई… ए काळा नाही हं काळा नाही, वारविश तर अजिबात नाही.” आता मात्र सांगावसं वाटतं, अरे लावना रंग, गुलाल तरी लावा… घरात काय बसलात बाहेर तरी या … ”
श्या… परत लहान व्हावसं वाटतंय… ती धमाल मस्ती, मजा अनुभवावीशी वाटतीये… निदान एक दिवस तरी स्वतःला विसरा, लहान होऊन पहा…
मुळात मोठं व्हायचय कुणाला …?!?
तुमच्यातल्या बालमनाला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा !!!
बाजारात हर्बल रंग मिळतात ते वापरा. पाण्याचा वापर कमीत कमी करा. रंगीत पाणी प्या हवं तर. पण रंग खेळायचं विसरू नका!
—————————— रानी देशपांडे